महामुंबईताज्या घडामोडी
६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण
January 5, 2022 05:57 PM 85
कल्याण : ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करणाऱ्या तिघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार खमनी सुभाषिश बॅनर्जी यांनी १ जानेवारी रोजी त्यांचे पती सुभाषिश बॅनर्जी (६५) यांना त्यांच्या घरातून मनजीत कुमार यादव व त्याचे दोन साथीदार यांनी पाच लाख रुपयासाठी जबरदस्तीने अपहरण करून नेल्याचे सांगितले.
मानपाडा वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, सपोनिरी दत्तात्रय सानप यांनी तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.