Friday, July 4, 2025

जे. जे. रुग्णालयातील ६१ डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

जे. जे. रुग्णालयातील ६१ डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आता जे. जे. रुग्णालयातील तब्बल ६१ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून ही माहिती देण्यात आली आहे. आधीच निवासी डॉक्टरांची संख्या कमी असून कोरोनामुळे अनेकजण कर्तव्यावर नसल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची भीती आहे, असे मार्डचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश दहिफळे यांनी सांगितले.



राज्यात २२१ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण


पदव्युत्तरच्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे नीटचे समुपदेशन रखडल्याने २७ नोव्हेंबरपासून देशभरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चा झाल्यानंतर देशातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले होते.


“डॉक्टरांची कमतरता असल्याने ओपीडी सुरळीत चालत नाही आहेत. गेल्या ४८ तासात १२० डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय अजून काही जणांना लागण होऊन ही संख्या वाढण्याची भीती आहे. याचा परिणाम रुग्णसेवेवर होणार आहे. यामुळेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाच्या संचालक मंडळाने दिलेले आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावे,” अशी मागणी डॉक्टर अविनाश दहिफळे यांनी केली आहे.


“मनुष्यबळ पुन्हा भरण्याच्या आश्वासनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. आमच्या डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होत असताना आम्ही ६० टक्के मनुष्यबळासोबत काम करत आहोत. हे डॉक्टर रुग्णालय, घरांमध्ये विलगीकरणात आहेत,” असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा