Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीसंजय राऊतांच्या कुटुंबातील ४ जणांना कोरोनाची लागण

संजय राऊतांच्या कुटुंबातील ४ जणांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गित आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ ( Maharashtra Corona Cases Increased ) होत आहे. राज्यातील मंत्री, खासदार, आमदारही कोरोनाच्या विळख्यात ( Maharashtra Minister Mla Corona Positive ) सापडले आहे. महाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना संसर्गित आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला ( Sanjay Raut Family Corona Positive ) आहे. त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

संजय राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोना संसर्ग झाला आहे. सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आल्याने कुटुंबातील सदस्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने घरगुती विलगीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, संजय राऊत सध्या गोवा येथे आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राऊत गोव्यामध्ये ( Sanjay Raut In Goa ) बैठका घेत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -