राज्यात २२१ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण

  63

मुंबई : कोरोना संसर्गाच्या या तिस-या लाटेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची संख्या मागील दोन लाटांच्या तुलनेमध्ये वाढत असल्याने चिंतेत भरच पडत असल्याचे दिसत आहे. निवासी डॉक्टरांच्या संघटनेने राज्यातील २२१ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. यामध्ये जेजे रुग्णालयातील ५१, लो. टिळक रुग्णालयामध्ये ३५, केईएममध्ये ४०, नायरमध्ये ३५ निवासी डॉक्टरांना संसर्ग झाल्याचे महाराष्ट्र राज्याच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी सांगितले. त्यांनी राज्यातील सार्वजनिक व पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.


राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर हे वसतिगृहामध्ये राहतात. त्यांचे राहते घर मुंबईत नसते. त्यामुळे बाधित असलेल्या निवासी डॉक्टरांना वसतिगृहामधील खोल्यामध्ये विलगीकरणात राहावे लागते. या निवासाची व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक रुग्णालयातील जागा वाढल्या असल्या तरीही निवासाच्या सुविधा अद्ययावत झालेल्या नाहीत. दोन पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका ठिकाणी राहावे लागू नये, तसेच संसर्गामुळे वैद्यकीय कर्मचारी तसेच डॉक्टरांचे आरोग्य जपायचे असेल तर त्यांच्यासाठीही सुरक्षित अंतराचा नियम वसतिगृहामध्येही पाळायला हवा, असा आग्रह निवासी डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता