Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

कोकाकोला कंपनीविरोधात कामगारांचे बेमुदत उपोषण

अनंता दुबेले


कुडूस : कोकाकोला कंपनी व्यवस्थापन व ठेकेदार यांच्या मनमानी कारभाराविरोधात येथील कामगारांनी आजपासून (बुधवार ५ जानेवारी) महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या झेंड्याखाली आपल्या विविध मागण्यांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे कामगार व प्रशासन यांचा वाद चिळघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोकाकोला ही शीतपेय बनवणारी कंपनी असून या कंपनीत स्थानिक भूमिपुत्र कामगार गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. कंपनी प्रशासन व ठेकेदार यांचा मनमानी कारभार सुरू असून ठेकेदाराने कामगारांचे भविष्यनिर्वाह निधीचे पैसे भरलेले नाहीत. पगारही वेळेवर देत नाहीत. १५ वर्षे काम करून कामावर घेत नाहीत. सांगायला गेल्यावर दमदाटी करतात, त्याचावर फौजदारी कारवाई करावी, बी ग्रुपच्या कामगारांची आवश्यकता असलेले शुगर डंपींग व पल्प कटिंग हे दोन विभाग क्रोनल सिस्टममध्ये यावेत.

नोव्हेंबर २०२१ चा पगार मिळावा, तसेच डिसेंबर २०२१ मध्ये कामावर बोलवून परत पाठवलेल्या २५ दिवसांचा पगार मिळावा, बी ग्रुप मधील २६ कामगारांना कायमस्वरूपी करावे, पगार स्लिप २ वर्षांच्या दिलेल्या नाहीत, त्या तत्काळ देण्यात याव्यात, तीन महिने काम केलेले ७ सुट्ट्या बाकी आहेत त्या देण्यात याव्यात, कोविड काळातील १९ महिन्यांचा पगार देण्यात यावा, मागील तीन वर्षांपासूनचे बुट व कपडे दिलेले नाहीत ते द्यावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. सदर मागण्या मान्य नसतील तर अंतिम हिशोब देणी तत्काळ द्यावीत, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

२४ कामगारांचा आंदोलनात सहभाग


बेमुदत उपोषणाला २४ कामगार बसले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा निर्धार कामगार संघटनेचे उपाध्यक्ष जितेश पाटील यांनी केला आहे.
Comments
Add Comment