Sunday, October 26, 2025
Happy Diwali

दिल्लीत विकेंड कर्फ्यू, सर्व सरकारी कर्मचा-यांना 'वर्क फ्रॉम होम'

दिल्लीत विकेंड कर्फ्यू, सर्व सरकारी कर्मचा-यांना 'वर्क फ्रॉम होम'

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील कोरोना आणि ओमायक्रॉन रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिल्लीमध्ये विकेंड कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत राजधानीत ४००० हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या आठवड्यापासून वीकेंड कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. दिल्लीत शुक्रवारी रात्री १० ते सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत वीकेंड कर्फ्यू लागू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर दिल्ली डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची महत्त्वाची बैठकही पार पडली. त्यात वेगाने वाढणारी कोरोनाची रूग्णसंख्या लक्षात घेता कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याता आला. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच यातून सूट दिली जाणार आहे. तर, खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीदेखील कार्यालयातील संख्या ५० टक्क्यांवर आणण्यात येणार आहे.

Comments
Add Comment