Wednesday, May 21, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

पुण्यातील शाळा ३० जानेवारीपर्यंत राहणार बंद

पुणे : वाढत्या ओमायक्रॉनच्या रूग्णसंख्येमुळे पुणे शहरातील पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आढावा बैठक पार पडली. यामध्ये पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


दरम्यान, वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय उद्या दुपारी ४ वाजता घेतला जाणार आहे.


पुण्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले ८० टक्के लोक कोरोनाबाधित आढळत आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.


दरम्यान, वाढत्या रूग्णसंख्येमुळे चिंता करण्याचे कारण जरी नसले तरी, आधीच्या निर्बंधांची अधिक सक्तीने अंमलबाजवणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुण्यातील रूग्णसंख्या एका आठवड्यात चौपट झाल्याचेदेखील यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment