Sunday, October 26, 2025
Happy Diwali

लस घेतली नाही, असे नागरिक बाहेर फिरताना आढळले तर क्वारंटाईन करणार

लस घेतली नाही, असे नागरिक बाहेर फिरताना आढळले तर क्वारंटाईन करणार
पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या डोसची तारीख उलटूनही लस घेतली नाही, असे नागरिक बाहेर फिरताना आढळले तर त्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मावळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने आमदार सुनील शेळके यांनी मावळ वासीयांना लस घेण्याचे आवाहन करत क्वारंटाईन करण्याचा इशारा दिला आहे. मावळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढु लागले असून नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करणे गरजेचे असुन येत्या 15 जानेवारी पुर्वी कोरोना लसीचे दोन डोस मुदतीत घेणे अनिवार्य असून ज्यांची दुसर्या डोसची मुदत होऊनही डोस न घेतल्यास 15 जानेवारी नतंर ती व्यती बाहेर आढळ्यास त्याला क्वारंटाईन करण्यात येईल असा इशारा मावळचे आ. सुनिल शेळके यांनी दिला. मावळ तालुक्यात येत्या दोन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असुन त्या पार्श्वभूमीवर शासनाचे निर्बंध पाळण्यासाठी आज मावळ तालुक्यातील आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी यांची बैठक येथील पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली त्या वेळी आमदार सुनिल शेळके बोलत होते.
Comments
Add Comment