Friday, September 19, 2025

प्रियंका गांधी विलगीकरणात; कुटुंबातील सदस्य आणि कर्मचारी कोरोनाबाधित

प्रियंका गांधी विलगीकरणात; कुटुंबातील सदस्य आणि कर्मचारी कोरोनाबाधित

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा अतिशय झपाट्याने वाढू लागल्याचे दिसत आहे. सर्वसामान्य व्यक्तीपासून ते अगदी व्हीव्हीआयपी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या कुटुंबातही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास आणि स्टाफमधील एकास कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आता प्रियंका गांधी या विलगीकरणात आहेत.

प्रियंका गांधी यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. माझ्या कुटुंबातील एक सदस्य आणि माझा एक कर्मचारी काल कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. माझी चाचणी आज निगेटिव्ह आली आहे. मात्र डॉक्टारांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी विलगीकरणात आहे आणि काही दिवसानंतर पुन्हा एकदा तपासणी करून घेणार आहे. असे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.

Comments
Add Comment