Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

पंतप्रधान ३० जानेवारीला करणार 'मन की बात'

पंतप्रधान ३० जानेवारीला करणार 'मन की बात'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार ३० जानेवारी सकाळी ११ वाजता 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. 'मन की बात' चा हा ८५वा भाग असेल. २०२२ वर्षाचा हा पहिला भाग असणार आहे.

नागरिक २८ जानेवारी पर्यंत ‘मन की बात' कार्यक्रमासाठी माय गोव्ह, नमो अप्लिकेशन किंवा 1800117800 क्रमांकाच्या माध्यमातून सूचना, अभिनव कल्पना आणि नव-नवीन उपक्रमांबद्दल माहिती पाठवू शकतात. 'मन की बात' चे थेट प्रसारण नमो आप्लिकेशन, दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीच्या सर्व प्रादेशिक केंद्रांद्वारे, तसेच केंद्र सरकारच्या विविध सामाजिक माध्यमांद्वारे केले जाते.

मुख्य भागाच्या प्रसारणानंतर हिंदी शिवाय इतर भारतीय भाषांमध्येही 'मन की बात' चे प्रसारण केले जाते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >