Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीपिंकी आणि शरयू उलगडताना

पिंकी आणि शरयू उलगडताना

मुंबई : मनोरंजनाच्या प्रवाहात सातत्याने नवनवे प्रयोग करणारी महाराष्ट्राची नंबर वन वहिनी नव्या वर्षात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी भेट घेऊन येणार आहे. १७ जानेवारीपासून रात्री ११ वाजता स्टार प्रवाहवर सुरू होतेय नवी मालिका ‘पिंकीचा विजय असो’.

आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. खाईन तर तुपाशी अश्या ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. दुसऱ्याकडून काम करुन घेण्याचं अजब कसब पिंकीकडे आहे. तिची इंग्रजी बोलण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल.

पिंकी आणि शरयूमध्ये अजिबात साम्य नाही. पिंकी बिनधास्त आहे. तिची अखंड बडबड सुरु असते. पिंकीच्या स्वभावाच्या पूर्ण विरोधी असा शरयूचा स्वभाव आहे. शरयू खूपच शांत आहे. त्यामुळे पिंकी साकारणं हे  नवं आव्हान आहे. पिंकीची बोलण्याची स्टाईल शरयूच्या इतकी अंगवळणी पडली आहे की शूटिंग व्यतिरिक्तही ती इतरांशी संवाद साधताना त्याच भाषेत बोलते.

सेट हे शरयूचं दुसरं घरच आहे. सहकलाकार आणि  दिग्दर्शक  खूप समजून घेतात. पिंकी हे पात्र उभं करण्यात  संपूर्ण टीमचा मोलाचा वाटा आहे. लहान भावाची भूमिका साकारणाऱ्या हर्षद नायबळसोबत शरयू सेटवर खूप धमाल करते. त्याच्यावर ताईगिरी दाखवतानाच भावाच्या मायेने प्रेमही करते. त्यामुळे नव्या वर्षाने तिला नवं कुटुंब दिलंय असंच म्हणायला हवं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -