Sunday, October 26, 2025
Happy Diwali

नव्या बाधितांना सौम्य लक्षणे

नव्या बाधितांना सौम्य लक्षणे
मुंबई : जानेवारी गेल्या आठ दिवसांत आढळलेल्या करोना बाधितांपैकी सुमारे 75 टक्के जणांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. यामुळे या रुग्णांत सौम्य लक्षणे आहेत.सध्या सक्रिय रुग्णसंख्या जरी वाढली असली, तरी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागण्याचे प्रमाणही कमी आहे. करोनाचे संकट गंभीर झाले, तर महापालिकेची आरोग्य यंत्रणा त्याला तोंड देण्यास सज्ज आहे,' असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी स्पष्ट केले. शहरात गेल्या आठ दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत महापौर मोहोळ यांनी करोनाची शहरातील सद्यःस्थिती स्पष्ट केली. यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते. महापौर म्हणाले, 'शहरात ओमायक्रॉनचे 47 रुग्ण आढळून आले असून, त्यांच्यामध्येही सौम्य लक्षणे आहेत. करोना बाधितांच्या तुलनेत ओमायक्रॉन बाधितांत कमी लक्षणे दिसून आली आहेत. सध्या 300 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Comments
Add Comment