
राजेश टोपे म्हणाले, पहिल्या लाटेत वीस लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. दुसऱ्या लाटेत 40 लाख लोक कोरोनाबाधित झाले, दुर्देवाने कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यात जवळपास 80 लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी मनुष्यबळाची खूप गरज आहे. परंतु, सध्या केंद्राने फक्त आयसीयुसाठीच लागणाऱ्या मनुष्यबळाला मान्यता दिली आहे. कोवीड सेंटरसह इतर कामांसाठीही मुनषबळ उपलब्ध करून द्यावे. त्याबरोबरच राष्ट्रीय आरोग्य अभियानाला ( NHM) केंद्राने परवानगी दिलेली नाही. केंद्राने याला मान्यता दिली पाहिजे. शिवाय NHM कडून या आधिची राहिलेली रक्कम देण्यात यावी."
"राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे औषधांची उपलब्धता खूप गरजेची बाब आहे. केंद्राकडे त्यासाठी मागणी केली आहे. केंद्राने लवकरात लवकर औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा. त्याबरोबरच लॉकडाऊन आणि कोरोनाचे निर्बंध देशभर कसे असावेत? याची केंद्राने एक नियमावली तयार करून द्यायला हवी. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबतही तिसऱ्या लाटेच्या आनुषंगाने अनेक मागण्या केल्या आहेत. लवकरच तेही आमच्या मागण्या मान्य करतील असेही राजेश टोपे यावेळी म्हणाले.