मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवरील एका सुरक्षा कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांचे पुढील १० दिवसांतील सर्व कार्यक्रम आणि नियोजित गाठीभेटी रद्द केल्या आहेत.
शिवतीर्थवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचण्यांचे निकाल आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून पुढील निर्णय घेतला जाईल.
याआधी राज्यात २० मंत्री आणि २२ आमदारांना कोरोनाची लागण झाला. त्यापाठापाठ शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि मुंबईतील भाजप नेते अतुल भातखळकर यांनाही सोमवारी कोरोनाची लागण झाली आहे.