
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला आपल्या निखळ विनोदांनी खळखळून हसवणारे भाऊ कदम सर्वांचेच प्रचंड लाडके आहेत. त्यांच्या विनोदांच्या अचूक टाईमिंगमुळे भाऊ सर्वांचीच मनं जिंकतात. लहानांपासून ते थोरांपर्यंत भाऊ कदम यांचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्याभोवती चाहत्यांचं खुप मोठं वलय आहे. चाहत्यांना भाऊ हे आपल्यातलेच एक वाटतात आणि म्हणूनच ते त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात. भाऊंना आतापर्यंत अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. आता त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
'गोदरेज व्हेज ऑइल्स' ने त्यांना ब्रँड अॅम्बेसिडर करण्याचा निर्णय घेतला आहे.भाऊ जाहिरातींमध्ये स्वयंपाक करताना दिसणार आहेत. 'गोदरेज व्हेज ऑइल' वापरून ते विविध महाराष्ट्रीयन पदार्थ तयार करणार असून स्वयंपाकासंबंधीचे त्यांचे काही अनुभव ते प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत. सेलिब्रिटी शेफ वरुण इनामदार आणि शेफ तारा देशपांडे यांच्यासोबत भाऊ वेगवेगळे पदार्थ करताना दिसतील.