Monday, September 15, 2025

कोव्हॅक्सीन ऐवजी कोविशिल्ड दिल्याचा प्रकार

कोव्हॅक्सीन ऐवजी कोविशिल्ड दिल्याचा प्रकार
नाशिक : पाटोदा येथील आरोग्य केंद्रात अथर्व पवार या १६ वर्षीय मुलास कोव्हॅक्सीन ऐवजी कोविशिल्ड लस दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकारामुळे पालक वसंत पवार यांनी तक्रार करुन संताप व्यक्त केला. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी अनावधानाने आरोग्य सेविकेकडून सदर चुक झाल्याचे मान्य केले. येवला शहरातील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील पाटोदा, अंदरसुल व सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण सुरू आहे. शासन निर्देशानुसार कोव्हॅसीन लस या वयोगटातील मुला- मुलींना दिली जात आहे. पण, पाटोद्यात कोविलशिल्ड लस देण्यात आल्यामुळे पालक संतप्त झाले आहेत.
Comments
Add Comment