Wednesday, May 7, 2025

महामुंबईताज्या घडामोडीठाणे

ठाण्यात एकाचवेळी १६ केंद्रावर लसीकरण

ठाण्यात एकाचवेळी १६ केंद्रावर लसीकरण
ठाणे वार्ताहर/ ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात एकाचवेळी १६ लसीकरण केंद्रावर १५ ते १८वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले असून कोरोनाच्या लढाईत महापालिकेने लसीकरणाचे महत्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे मत राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आज ब्राह्मण शिक्षण मंडळ संचलित वर्तक नगर माध्यमिक विद्यालय येथे संपन्न झालेल्या लसीकरण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

या शुभारंभप्रसंगी खासदार राजन विचारे, उपमहापौर सौ. पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते अशरफ उ. शानू पठाण, आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती अध्यक्षा सौ. निशा पाटील, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा सौ.राधिका फाटक, नगरसेविका सौ. कल्पना पाटील, श्रीमती. विमल भोईर, सौ. परिषा सरनाईक, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, शिक्षणाधिकारी श्रीमती दहितुले, ब्राह्मण शिक्षण मंडळाचे केदार जोशी आदी उपस्थित होते.
Comments
Add Comment