Monday, June 16, 2025

मोहम्मद हाफीजचा क्रिकेटला अलवीदा

मोहम्मद हाफीजचा क्रिकेटला अलवीदा
कराची : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार मोहम्मद हाफीजने क्रिकेटच्या तीन्ही प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. ४१ वर्षीय हाफीजने पाकिस्तानसाठी २१८ एकदिवसीय, ५५ कसोटी आणि ११९ टी २० सामने खेळले आहेत. २००३ मध्ये हाफीजने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ऑगस्ट २००३ मध्ये तो कसोटी संघात सहभागी झाला. तर हाफीज पहिला टी२० सामना २००६ मध्ये खेळला. २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत हाफीज पाकिस्तानच्या संघात सहभागी होता.

हाफीजने पाकिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ शतकांसह ६६१४ धावा केल्या आहेत. त्याच्या खात्यात १३९ बळी आहेत. ५५ कसोटी सामन्यांमध्ये १० शतकांच्या जोरावर या खेळाडूने ३६५२ धावा केल्या असून ५३ बळी मिळवले आहेत. ११९ टी२० सामन्यांमध्ये त्याने २५१४ धावा केल्या असून ६१ विकेट मिळवले आहेत.
Comments
Add Comment