मुंबई : झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेला. यामध्ये संकर्षण म्हणताना दिसतोय की, आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार. यावरून तर असंच दिसत की या किचन मध्ये भल्या भल्यांचा कस लागणार आहे.
आगामी भागात पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे या नेते मंडळींनी या सेटवर हजेरी लावली. यात महाराज म्हणजेच प्रशांत दामले यांनी या तिन्ही नेत्यांना महाराजांच्या आवडीचे पदार्थ करायचं आव्हान दिलं आणि सुरु झाली एक स्पर्धा, पण महाराजांच्या आवडीचे हे पदार्थ तयार करत असताना या मंडळींना अनेक दिव्यातून जावं लागणार.
विसरलेले पदार्थ पेठेतून आणण्यासाठी काहीठिकाणी युती तर काहीवेळा खुर्चीसाठी सामना करावा लागणार आहे. या तिघांनी सुद्धा मस्त मजेदार किस्से या भागात सांगितले. पंकजा मुंडे यांची गटारी अमावास्येला काय फजिती झाली? प्रणिती शिंदे यांनी पायलट सारखी घोषणा कशी केली? रोहित पवार यांनी कार्यक्रमात एका खेळात खुर्चीचा त्याग केला आणि मग काय गुगली टाकली? हे जाणून घेण्यासाठी हा रंजक भाग चुकवू नका.
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…
सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून…
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)…
मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला…
काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर…