Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीविमानसेवेसाठी आयमाकडून इंडिगो एअरलाइन्सला साकडे

विमानसेवेसाठी आयमाकडून इंडिगो एअरलाइन्सला साकडे

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर नाशिकमधून देशातील विविध राज्यांत व प्रदेशात इंडिगो एअरलाइन्सतर्फे विमानसेवा सुरू करण्यात यावी, यासाठी आयमाच्या वतीने इंडिगो एअरलाइन्सला साकडे घालण्यात आले आहे. नाशिकमधून इंडिगो एअरलाइंस विविध विमान सेवा सुरू करण्यास सकारात्मक असल्याचे इंडिगो एअरलाइन्सचे व्यवस्थापक गौरव जाजू व मॅनेजर कॉर्पोरेट सेल्स शशांक लठू यांनी सांगितले.

नाशिकमधून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बुब, उन्मेष कुलकर्णी, आयपीपी राजेंद्र अहिरे, बीओपीपी चेअरमन धनंजय बेळे, एव्हिएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावल यांनी इंडिगो एअरलाइन्सचे व्यवस्थापक गौरव जाजू व मॅनेजर कॉर्पोरेट सेल्स शशांक लठू यांच्यासोबत बैठक घेतली.

नाशिकमधून इंडिगोने विमानसेवा सुरू व्हावी, याकरिता नाशिकमधून पोषक वातावरण असल्याचे आयमाचे अध्यक्ष तलवार यांनी सांगितले. आयमा बीओपीपी चेअरमन धनंजय बेळे यांनी नाशिकमधून व्यापार, उद्योग, कृषिक्षेत्र यास मोठा वाव आहे. इंडिगोच्या सेवेला उत्तम व चांगला प्रतिसाद मिळेल याविषयी, तर उपाध्यक्ष निखिल पांचाळ यांनी नाशिकच्या उद्योग व्यवसायाबाबत माहिती दिली. एव्हिएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावल यांनी नाशिकमधून आजपर्यंत झालेल्या विमान प्रवाशांबाबत तपशील सांगितला. सर्व स्तरातून प्रतिसाद बघता नाशिकमधून विविध शहरांत सेवा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक असल्याचे इंडिगो एअरलाइन्सकडून सांगण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -