Wednesday, July 9, 2025

नागपूरात पार पडला दोन तरुणींचा साखरपुडा

नागपूरात पार पडला दोन तरुणींचा साखरपुडा

नागपूर :नागपूर येथील डॉ. सुरभी मित्रा आणि कोलकाता येथील पारोमिता या दोघींचा साखरपु़डा पार पडला आहे वाचून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे. एलजीबीटी समूहासाठी हा मोठा बदल पाहायला मिळतोय. या दोघींची नागपूर येथील एका परिषदेत भेट झाली. भेटीगाठी वाढत गेल्या. वर्षभर मैत्री निभावल्यानंतर आपल्यात एक अनोखे नाते असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.


प्रेमविवाह म्हटलं की अनेक स्तरावर आजही विरोध होतो, अशात लेसबीयन तरुणींच्या या अनोख्या नात्याला विरोध नसता झालातर नवलच. मात्र, सुरभी आणि पारोमिता या दोघींचे कुटुंबीय समंजस आणि उच्चशिक्षित असल्यानं त्यांनी या नात्याचा अखेर स्वीकार केला. सुरभी डॉक्टर आहे. तर, पारोमिता एका कॉर्पेरिट कंपनीमध्ये असून ती दिल्ली येथे नोकरी करते.


या दोघींचा नुकताच नागपूरमध्ये साक्षगंध करण्यात आला.  काही मोजके नातेवाईक, एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायो, ट्रान्सजेंडर) समूहातील सदस्य अशा दीडशे लोकांच्या उपस्थितीमध्ये हा अनोखा सोहळा पार पडला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा