
बंगळुरु : कोरोना विषाणूच्या नव्याने निर्माण झालेल्या प्रकाराने खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेल्या बेळगाव आणि विजयापूरा भागात अधिक सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे.
या भागात कोरोनाचा प्रभाग वाढतो आहे. ते पुढे म्हणाले की, नागरिकांनी नियमांचे पालन करावे तसेच संचारबंदी लावण्याची परिस्थिती निर्माण करू नये.