Wednesday, July 2, 2025

नाशिक दंत महाविद्यालयात आणखी १० जणांना कोरोना

नाशिक दंत महाविद्यालयात आणखी १० जणांना कोरोना

नाशिक : नाशिकमधील दंत महाविद्यालयातील १७ विद्यार्थिनी कोरोना बाधित आढळून आल्याची घटना ताजी असताना आणखी १० विद्यार्थिनींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे, कोरोना बाधित मुलींची संख्या २७ वर जाऊन पोहोचली आहे.


महानगरपालिकेची पथके दंत महाविद्यालयात पोहोचली असून मुलींच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी सुरू केली आहे. वसतिगृहात व्यवस्थापनाने ५२ विद्यार्थ्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात १७ विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्या होत्या.


त्यानंतर मनपा पथकाने वसतिगृहात जाऊन पाहणी केली. ज्या विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्या त्यांना वसतिगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे. गरज भासल्यास विद्यार्थिनींना पुढील उपचारांसाठी पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये हलविण्यात येणार आहे.

Comments
Add Comment