Tuesday, December 23, 2025

भिवंडी आश्रमशाळेत २० जणांना कोरोना

भिवंडी आश्रमशाळेत २० जणांना कोरोना

भिवंडी:  भिवंडी ग्रामीण भागातील चिंबीपाडा शासकीय आश्रमशाळेतील २० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यामध्ये १८ विद्यार्थी, तर २ कर्मचाऱ्यांना लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

अजूनही विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची चाचणी सुरू करण्यात आली आहे. भिवंडी ग्रामीणमधील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने या विद्यार्थ्यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे,

तर आश्रम शाळेबाहेर विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकच गर्दी केली होती. कोरोना रुग्णांत वाढ झाल्याने भिवंडीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment