नाशिक : नाशिककरांसाठी अतिशय सुखदायी सेवा देणाऱ्या सिटीबसचा प्रवास नवीन वर्षात महाग झाला आहे. महापालिका प्रशासनाने बसभाड्यात पाच टक्क्यांची वाढ केली आहे. नाशिक महानगर परिवहन लिमिटेड कंपनीने दरवर्षी पाच टक्के भाडेवाढीचे धोरण यापूर्वीच मंजूर केले आहे. त्यानुसार ही वाढ केल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
सिटीलिंक बससेवेची ८ जुलैपासून सुरुवात झाली आहे. त्यात पाच टप्प्यात २५० बस रस्त्यावर उतवण्याचे नियोजन आहे. सध्या ४२ मार्गांवर १४८ बस धावतात. दिवसाकाठचे उत्पन्न तब्बल १० लाख रुपयांपेक्षाही पुढे गेले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या या बस सेवेला अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. या बससेवेने आतापर्यंत ९ कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. मात्र, या सेवेवर १८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तूर्तास तरी महापालिका ९ कोटींनी तोट्यात आहे.
सिटीलिकंतर्फे नागरिक आणि विद्यार्थ्यांना सवलतीचे पास दिले जातात. महापालिकेने नुकताच एक ठराव घेतला आहे. त्यानुसार आता दृष्टीहीन बांधवांना मोफत प्रवासाची सुविधा या बसमधून देण्यात येणार आहे. ३ हजार 178 विद्यार्थ्यांनी या बसचा पास काढला आहे. बसच्या एक दिवसीय पासचा लाभ ४५ हजार ४८२ जणांनी घेतला आहे. साप्ताहिक पास ११९ आणि मासिक पासचा लाभ १९४ प्रवाशांनी घेतला आहे. त्रैमासिक पासचा लाभ १२ प्रवाशांनी घेतला आहे.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…