Wednesday, August 13, 2025

वसई-विरारमध्ये लसीकरणास मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वसई-विरारमध्ये लसीकरणास मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नालासोपारा :राज्यभरात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना लसीकरण करण्यात सुरुवात झाली. वसईत ८ केंद्रांवर ७५०० डोस उपलब्ध करण्यात आले होते. तसेच, वसईतही मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी प्रतिसाद मिळाला. नालासोपारा, विरार, वसई या ठिकाणी असलेल्या केंद्रांवर पालकांसह मुलांनीही मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या. सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेला लसीकरणाला पालकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसला.

सर्वत्र लहान मुलांसाठी आता लसीकरण सुरू करण्यात आले आहे. वय १५ ते १८ वर्षांपर्यंत मुलांना लस देण्यात येणाऱ्या गेले अनेक महिने याबाबत सातत्याने सुरू होत्या. अखेर या लसीकरणाला सुरुवात झाली असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. वसईत ८ केंद्रांवर ७५०० डोस उपलब्ध झाले होते. पहिल्याच दिवशी ५०० हून अधिक मुलांनी याचा लाभ घेतला.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त होत असतानाच शाळा व कॉलेज पुन्हा बंद करण्याची वेळ आली आहे. पण पुढच्या वर्षी शाळा कॉलेज सुरू झाली तर लसीकरण पूर्ण झाल्यामुळे कुठेही जाता येणार असल्याने मुलांनी आनंद व्यक्त केला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >