नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आज, सोमवारी भाजपकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. दिल्ली सरकारच्या नव्या एक्साइज पॉलिसीविरोधात हे आंदोलन करण्यात आले.केजरीवाल सरकराने दारुसंदर्भात घेतलेल्या नव्या निर्णयाविरोधात भाजपने राष्ट्रीय महामार्ग 24 वर या आंदोलनामुळे लक्ष्मी नगर, दक्षिण दिल्लीत मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाले होते.
केजरीवाल सरकराने काही दिवसांपूर्वी दिल्ली सरकारने नवीन एक्साइज पॉलिसी लागू केली. याअंतर्गत जवळपास 895 नव्या दारु दुकानांना परवाने मिळाले. नव्या पॉलिसीनुसार प्रत्येक प्रभागात 3 नवी दारुची दुकाने असतील. यावरून भाजप सातत्यानं केजरीवाल सरकारला घेरत आहे. दिल्लीत प्रत्येक जिल्ह्यात भाजपने सोमवारी चक्का जाम आंदोलन पुकारलं आहे. यामुळे लक्ष्मी नगर विकास मार्ग आयटीओपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे अदेश गुप्ता यांनी केजरीवाल सरकारवर टीका करताना म्हटलं की, केजरीवाल सरकारचं सत्य म्हणजे त्यांनी 500 शाळा आणि 20 कॉलेज उघडण्याचं आश्वासन दिलं. पण एकही सुरु केलं नाही. मात्र दुसरीकडे ते सुरु काय करतायत तर 850 दारुची दुकाने अशा शब्दात त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.