Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

घाटकोपर झोपडपट्टीतील कपड्याच्या गोदामाला भीषण आग

घाटकोपर झोपडपट्टीतील कपड्याच्या गोदामाला भीषण आग

मुंबई : घाटकोपर परिसरातील झोपडपट्टीतल्या कपड्याच्या गोदामाला आज सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग आटोक्यात आली असून लवकरच ती पूर्णपणे आटोक्यात येईल, असे अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी सांगितले.


घाटकोपर अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, ही आग लेव्हल वनची आहे. आगीचे कारण स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. झोपडपट्टीत असलेल्या गोडाऊनमध्ये ही आग लागली होती. अरुंद गल्ली आणि लगतच्या झोपडपट्टीमुळे आग विझवणे अवघड झाले होते.


गोदामात प्लास्टिकच्या वस्तू असल्याने आगीपासून निघणारा काळा धूर आजूबाजूच्या परिसरात पसरला असून आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे.

Comments
Add Comment