Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजव्हीआयपींच्या ‘सारथी’

व्हीआयपींच्या ‘सारथी’

प्रियानी पाटील

महाभारतात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य भगवान श्रीकृष्णांनी केले, तर कर्णाचे सारथ्य शल्य याने. पुराणात अनेक कथा पाहिल्या, ऐकल्या तर रथांचे सारथ्य कुणा महिलेने केल्याचे ऐकिवात नाही. पण आजच्या आधुनिक काळात व्हीआयपींच्या गाडीचे सारथ्य एका महिलेने केले आणि सगळ्यांच्याच भुवया आश्चर्याने उंचावल्या. पटापट ट्वीट आिण सोशल मीडियाच्या माध्यमातून ही महिला सारथी अभिमानाने साऱ्यांच्याच नजरेत तरळली आणि कौतुकाच्या वर्षावात चिंब भिजली देखील.

व्हीआयपी सिक्युरिटी ड्रायव्हिंग करणारी ही एकमेव महिला चिपी विमानतळावर व्हीआयपींच्या गाडीसाठी ड्युटी बजावत असतानाच तिच्या बिनधास्त, धाडसी कौशल्याने आज समस्त महिला, मुलींसमोर आदर्श ठरली आहे. कोल्हापूर अंबप पाडळी येथील पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक या आजच्या तरुणींसमोर अनन्यसाधारणच म्हणाव्या लागतील. आपल्या बिनधास्त अाणि धाडसी वृत्तीने व्हीआयपींचे सारथ्य करणाऱ्या ‘तृप्ती’ जेव्हा अजितदादा आणि बाकी मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य करण्यास सज्ज झाल्या तेव्हा भीतीचा लवलेशही नव्हता, असे सांगतात. कारण ड्युटी हे एकमेव तत्त्व नजरेसमोर ठेवून त्यांनी बजावलेले कार्य हे खुद्द अजितदादांच्याही काैतुकास पात्र ठरले. शिवाय सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव झाला तो निराळा!

त्या सांगतात, व्हीआयपींसाठी ड्रायव्हिंग करतानाचा हा दिवस स्पीचलेस करणारा ठरला कारण, आपण अजितदादा आणि त्यांच्यासोबत असलेल्या मंत्र्यांच्या गाडीचे ड्रायव्हिंग करत आहोत हे आपणास माहीतच नव्हते. जेव्हा गाडी चालवायला घेतली तेव्हा पाहिले, तर अजितदादा आणि बाकी मंत्री गाडीत आहेत, तेव्हा थोडी धास्ती वाटली. पण गाडीत बसल्या बसल्या अजितदादा म्हणाले की, पहिल्यांदाच एवढ्या राजकीय कारकिर्दीत पहिली महिला चालक आहे. ते बोलल्यानंतर एकदम कम्फर्टेबल झाले आणि नंतरचा प्रवास एकदम छान झाला आिण मग झाले फोन चालू आिण कौतुकाचा वर्षाव सुरू कारण, सतेज पाटील यांनी केलेल्या ट्वीटनंतर हे साऱ्यांनाच कळले. यावेळी थोडं प्राऊड फील केलं, आनंदही वाटला, एक महिला म्हणून अजितदादांच्या गाडीचे सारथ्य केल्याचा हा अनुभव आठवणीत राहणारा आहे, ज्यांच्यावर व्हीआयपी ड्रायव्हिंगच्या पहिल्याच दिवशी सगळीकडून कौतुकाचा वर्षाव झाला, त्या तृप्ती मुळीक यांचा व्हीआयपी ड्रायव्हिंगाचाही तो पहिलाच दिवस होता, जो कायमचा आठवणीत राहणारा ठरला असल्याचे त्या म्हणाल्या.

तृप्ती मुळीक या मूळच्या कोल्हापूरच्या. व्हीआयपींच्या गाडीचे ड्रायव्हिंग करण्याची जरी ही पहिलीच ड्युटी असली, तरी पण सगळे प्रोटोकॉल्स आपणास माहीत होते, त्यामुळे भीती वगैरे नाही वाटली. फक्त तो कम्फर्ट झोन कसा राहील हा विषय होता. कारण, सगळे मंत्री गाडीत होते, असे त्या सांगतात.

अलर्टबद्दल बोलताना त्या सांगतात, मंत्र्यांच्या गाडीबाबत थोडं अलर्ट राहावं लागतं. सिक्युरिटीबाबत अलर्ट राहावं लागतं, बाकी गाड्या असतातच आजूबाजूला. रस्त्याची परिस्थिती सोडली, तर बाकी इश्यू नसतोच तसा. तृप्ती गेली १० वर्षे सिंधुदुर्ग येथे कार्यरत आहेत. कोल्हापूर येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पोलीस भरती झाल्या. त्यानंतर मालवण पोलीस स्टेशनला नोकरी करता करताच त्यांनी आपले उर्वरित शिक्षण पूर्ण केले.

व्हीआयपींच्या गाडीचा ड्रायव्हिंगचा अनुभव सांगताना तृप्ती सांगतात, मंत्र्यांकडून माझे कौतुक झाले, मीडियात कौतुक झाले, लोकं मंत्र्यांना भेटण्यासाठी खूप काय काय करत असतात, पण माझं लक चांगलं असेल, तो याेग आला असेल आिण सगळे मंत्री माझ्या गाडीमध्ये बसले. याबाबत आपण स्पीचलेस असल्याचे त्या म्हणतात. आज एका महिला पोलिसाने व्हीआयपींच्या गाडीचे सारथ्य केल्याची बाब सोशल मीडियात गाजते अाहे. आजच्या तरुणींनीही या क्षेत्रात जरूर यावे, असे तृप्ती सांगतात.

त्यांच्या या पहिल्या दिवसाची सुरुवात सगळ्याच तरुणींसाठी आदर्श मानावी लागेल. मुलगी असली तरी तिने रडत न बसता, कमकुवत न राहता, छत्रपतींच्या मावळ्यासारखं जगावं, या प्रेरणेने जागृत करणारे तृप्ती यांचे विचार आदर्शवत मानावे लागतील. कारण खरा बिनधास्तपणा त्यांच्या विचारांतूनच नाही, तर त्यांनी कृतीतूनही दाखवून दिला अाहे. व्हीआयपी ड्रायव्हिंग करणारी एकमेव महिला म्हणून जेव्हा ती धाडसाने त्यात खऱ्या अर्थाने उतरते तेव्हा तिचे असामान्य व्यक्तिमत्त्व प्रतीत झाल्याशिवाय राहत नाही.
आजच्या तरुणींसाठी त्या सांगतात, खरं तर करिअरसाठी कोणतेही क्षेत्र दुरून डोंगर साजरे असेच असते, पण आपण जेव्हा त्यात धाडसाने पॅशन म्हणून उतरतो, तेव्हा खऱ्या अर्थाने सार्थकी ठरतो. आजच्या मुलींनी सोशल मीडियातील फेसबुक, ट्वीटरमध्येच न अडकता छत्रपती शिवरायांच्या मर्दानी खेळांकडे वळावं, जेणेकरून स्वत:च्या संरक्षणाचा मार्ग सुकर होईल.

स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या म्हणतात, जितकं तुम्ही समाजात घाबरून राहाल, तेवढे तुम्हाला घाबरवले जाईल. मात्र जेवढे बिनधास्त वावराल, तेवढे सेफ आिण कम्फर्टेबल राहाल. कोणतीही मुलगी आज कमी नाही, तिला कोणाच्या सिक्युरिटीची गरज नाही, स्वत:चं संरक्षण प्रत्येक मुलगी स्वत: करू शकते. फक्त तिने तिची मानसिकता बदलली पाहिजे. कराटे, तायक्वांदोपेक्षा मुलगी स्वत:चं संरक्षण स्वत: करू शकते. स्वत:कडे कोणतेही शस्त्र नसतानाही मुलगी स्वत:चं संरक्षण स्वत: कसं करू शकते, याचे प्रशिक्षण घेता येते. विनाशस्त्र समोरच्या व्यक्तीला नेस्तनाबूत करण्याची कला मुलींकडे असली, तर घरच्यांना मुलीच्या पाठीमागे तिची काळजी करण्याची
गरज उरणार नाही, हेही तेवढेच खरे आहे, असे त्या सांगतात.

तृप्ती स्वत: खूप बिनधास्त आहेत. त्यांच्या घरातूनही त्यांना चांगला सपोर्ट मिळाला आहे. आई-वडिलांनी पहिल्यापासून स्ट्राँग केल्यामुळे आज इथवर आहोत. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलींना शिवरायांच्या मावळ्याप्रमाणे घडवावं, त्या काळातील महिलांचा आदर्श आपण घेण्यासारखा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -