कोचीन : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी रविवारी केरळच्या कोचीन स्थित भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस विक्रांत’ या विमान वाहक युद्ध नौकेस भेट दिली.
स्वदेशी विमान वाहक युद्ध नौका आयएनएस विक्रांत च्या भेटी आणि पाहणी दरम्यान उपराष्ट्रपती नायडूंना विविध तांत्रिक आणि कार्यप्रणालीचे विविध पैलू, युद्धतंत्र आणि अन्य माहिती नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, भारतीय नौसेना, आयएनएस विक्रांतचे अधिकारी आणि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. उपराष्ट्रपती सचिवालयाने ट्वीटर द्वारे ही माहिती दिली.