
मुंबई : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची मुलगी आणि ठाकरे घराण्याची नववधू अंकिता पाटील (Ankita Patil) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवरून दिली आहे. अंकिता पाटील आणि निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांचे लग्न मंगळवारी पार पडले. निहार हा बिंधुमाधव ठाकरे यांचा मुलगा आहे.
https://twitter.com/iankitahpatil/status/1477479323514724356
विशेष म्हणजे लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी अनेक नेत्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे.
आता अंकिता पाटील यांनी ट्विटरवर आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलं.
हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिताचे लग्न निहार ठाकरे याच्यासोबत झाले आहे. निहार हा बिंधुमाधव ठाकरे यांचा मुलगा आहे. या लग्नाला मंत्री, राज्यपाल यांच्यासह अनेकांनी उपस्थिती लावली होती.