
नवी दिल्ली (हिं.स.) : पीएम किसान योजनेअंतर्गत 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये जमा केल्याबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली तसेच कौतुक केले.
ट्वीटर द्वारे अमित शाह म्हणाले, " शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही आणि गेल्या सात वर्षांपासून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी अविरत प्रयत्न करत असलेले शेतकरी-अनुकूल मोदी सरकार देशाने अनुभवले आहे.
शेतकऱ्यांना शेतीच्या बिकट काळात आर्थिक पाठबळ देऊन त्यांना कर्जमुक्त ठेवण्यासाठी पीएम किसान योजनेने खूप चांगली कामगिरी केली आहे.”