Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

आधी आईची हत्या, नंतर मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : आपल्या ७६ वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देत त्यांचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून त्यांचा हत्या केली. त्यानंतर इंजिनिअर असलेल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने पहाटे मेसेज करुन माहिती दिल्यानंतर आत्महत्या केली. गणेश फरताडे आणि त्याची आई निर्मला फरताडे अशी या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी गणेश याची मावस बहिण शोनित सावंत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश फरताडे व आपली आई निर्मला फरताडे हे दोघे धनकवडीमध्ये रहात होते. ग़णेश हा इंजिनिअर होता. त्याची नोकरी गेली होती. ५ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यांच्या आजारपणात खूप पैसा खर्च झाला होता. त्याची आईलाही अनेक व्याधी होत्या. त्यावर खूप पैसे खर्च होत होते. आईच्या औषधावर होणारा खर्च व नोकरी नसल्याने त्याला खूप कर्जही झाले होते. या कारणामुळे तो निराश झाला होता. त्यातून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

Comments
Add Comment