
मुंबई (हिं.स.) : सोने - चांदीच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात तर दरांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. मात्र आता नव वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीचे दर वाढले आहेत.
आज २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत घसरून ४७,१५० रुपयांवर स्थिरावली आहे. तर चांदीच्या दरात वाढ होवून १० ग्रॅमसाठी आता ६२७ रुपये मोजावे लागणार आहेत. शहरांनुसार सोने-चांदीच्या दरातही बदल झालेला दिसून येतो. जाणून घेवूया सोने-चांदीचे आजचे दर.
सोन्याचा आजचा दर : (१० ग्रॅमसाठी)
मुंबई - २२ कॅरेट - ४७,१५० रुपये, २४ कॅरेट - ४९,१५० रुपये
पुणे - २२ कॅरेट - ४६,५५० रुपये, २४ कॅरेट - ४९,०८० रुपये
नागपूर - २२ कॅरेट - ४७,१५० रुपये, २४ कॅरेट - ४९,१५० रुपये