Saturday, June 21, 2025

दुचाकीस्वाराची रिक्षाला धडक

दुचाकीस्वाराची रिक्षाला धडक
महाड (प्रतिनिधी) :मुंबई नालासोपारा येथून महाडच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेला दुचाकीस्वार पुढे जाणाऱ्या ओव्हरटेक करत असताना महाडकडून वहूरच्या दिशेने येत असलेल्या विक्रम रिक्षावर जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात गंभीररित्या जखमी होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर विक्रम रिक्षाचालक जखमी झाला आहे. या रिक्षाने ३ शाळकरी मुले जात होती. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

याबाबत महाड शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुंबई नालासोपारा येथे राहणारे राकेश यादव हे आपल्या ताब्यातील बुलेट क्रमांक एम एच ४८ टीएफ ७९९ वरून महाडच्या दिशेने येत होते. आज शुक्रवारी दुपारी पावणे बारा वाजण्याचे सुमारास ते वहूर गावचे हद्दीत पुढे जाणाऱ्या एका वाहनाला भरधाव वेगात ओव्हरटेक करत असताना समोरून महाडकडून वहूरच्या दिशेने येत असलेल्या विक्रम रिक्षा क्रमांक एम एच ०६ जे १५०३ वर ड्रायव्हर साईडचे बाजूस धडकल्याने झालेल्या अपघातात गंभीररीत्या जखमी होऊन दुचाकीस्वार राकेश यादव याचा मृत्यू झाला.

तसेच विक्रम रिक्षाचालक इम्तीयाज अब्दुल रेहमान (वय ३२, रा. वहूर मोहल्ला) हे जखमी होऊन त्यांचे पायाला दुखापत झाली आहे. या रिक्षातून ३ शाळकरी मुले प्रवास करत होती. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Add Comment