नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या वैष्णव देवी मंदिरात झालेल्या चेंगरा-चेंगरीच्या अपघातावार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीटर द्वारे ही माहिती दिली.
ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “माता वैष्णव देवी भवनात झालेल्या चेंगरा-चेंगरीच्या घटनेने अतिशय दु:ख झाले. बाधित परिवारांना संवेदना. जखमी लवकर बरे व्हावेत. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह आणि नित्यानंद राय यांच्याशी संपर्क साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. ”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोकाकुल कुटुंबियांप्रति शोकसंवेदना व्यक्त करीत अपघातातील मृतांच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएनआरएफ) सानुग्रह मदत जाहीर केली.अपघातातील मृतांच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसेच जखमींना 50 हजार सानुग्रह मदत जाहीर झाली आहे.