Tuesday, September 16, 2025

आता 10 वी व 12 वी परीक्षेच्या एक दिवस आधीही ऑनलाईन अर्ज करता येणार

आता 10 वी व 12 वी परीक्षेच्या एक दिवस आधीही ऑनलाईन अर्ज करता येणार
ठाणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता 12 वी ची परीक्षा 04 मार्च 2022 ला तर दहावीची परीक्षा दि. 15 मार्च 2022 ला सुरु होत असून नियमित शुल्क भरुन परीक्षेच्या एक दिवस अगोदर पर्यंत ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ही सुविधा फक्त मार्च-एप्रिल 2022 या वर्षा पुरतीच आहे.या बदलाची सर्व मुख्याध्यापक/प्राचार्य, सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी नोंद घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्र.सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
Comments
Add Comment