Saturday, February 7, 2026

नूतन वर्ष शांतता, चांगले आरोग्य आणि आनंद घेऊन येवो : उपराष्ट्रपती नायडू

नूतन वर्ष शांतता, चांगले आरोग्य आणि आनंद घेऊन येवो : उपराष्ट्रपती नायडू

नवी दिल्ली:  नूतन वर्ष 2022 निमित्त उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडूंनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

ट्वीटर द्वारे उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, " नवीन वर्ष म्हणजे नव्या प्रारंभाचा काळ. नवी लक्ष्ये आणि नवे संकल्प करण्याचा हा काळ आहे. या नववर्षाला आपण सर्व दयाळू, अधिक करुणामय आणि विचारशील मानव बनण्याचा संकल्प करुया.

या आनंदाच्या प्रसंगी आपण सर्व एकत्रितपणे आपल्या स्वतःला एक शांततामय, समृद्ध आणि सौहार्दपूर्ण समाजाच्या उभारणीसाठी वाहून घेण्याचा संकल्प करुया. हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात शांतता, चांगले आरोग्य आणि आनंद घेऊन येवो."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा