Thursday, July 10, 2025

वाहनचालकांनी ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह करू नये

वाहनचालकांनी ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह करू नये

मुंबई (प्रतिनिधी) :महाराष्ट्र राज्य टू व्हीलर्स युजर्स असोसिएशन आयोजित दिनदर्शिका प्रकाशन सन २०२२ व वितरणाचा कार्यक्रम माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते कुर्ला पश्चिम येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्रबोधिनी वाचनालयात पार पडला. यावेळी नववर्षाच्या पाश्वभूमीवर वाहन चालकांनी ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह करू नये, असे आवाहन अनिल गलगली यांनी केले.


कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य टू व्हीलर्स युजर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद साडविलकर यांनी केले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य टू व्हीलर यूजर्स असोसिएशन मुंबई दिव्यांग विभाग प्रमुख गिरीश कटके, धनंजय पवार, संतोष वेंगुर्लेकर, रचना पाटील, भाऊ शेलटकर, गितेश खेडेकर, चारूदत्त पावसकर, संजय मोरे, दीपक सचदेव, आनंद सरतापे, महेंद्र पवार, ज्ञानेश्वर बोडके, जे. एम. विजापूरकर, रामकुमार वर्मा, राजेंद्र गायकवाड, रमेश चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, जालींदर साळवे, संदीप हिरे, सलीम शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment