Sunday, July 14, 2024
Homeदेशभारतात लसीकरणाने पार केला 145.16 कोटी मात्रांचा टप्पा

भारतात लसीकरणाने पार केला 145.16 कोटी मात्रांचा टप्पा

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत शनिवारी सकाळी 7 वाजेपर्यंत भारतातील कोविड-19 लसीकरणाने गेल्या 24 तासांत लसीच्या 58,11,487 मात्रा देऊन,एकूण 145 कोटी 16 लाख(1,45,16,24,150) मात्रा देण्याचा टप्पा पार केला आहे.1,55,02,407 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.

गेल्या 24 तासांत 8,949 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्येत वाढ होऊन ती संख्या 3,42,75,312 झाली आहे. भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.32% इतका आहे. गेल्या 187 दिवसांपासून दररोज 50,000 पेक्षा कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे.गेल्या 24 तासात 22,775 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 1,04,781 आहे.देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.30% आहे. गेल्या 24 तासात एकूण 11,10,855 चाचण्या करण्यात आल्या.भारताने आतापर्यंत एकूण 67.89 कोटींपेक्षा जास्त (67,89,89,110) चाचण्या केल्या आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.10% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.05%इतका नोंदविण्यात आला आहे.

आतापर्यंत केंद्र सरकारने राज्य/केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या 151.70 कोटींहून अधिक (1,51,70,64,205) मात्रांचा (विनामूल्य) आणि थेट राज्य खरेदी श्रेणीद्वारे पुरवठा केला आहे. कोविड प्रतिबंधक लसीच्या 19.52 कोटी (19,52,96,356) पेक्षा अधिक मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असून लसीकरणासाठी उपलब्ध आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -