Monday, June 16, 2025

500 स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ

मुंबई : मुंबईकरांसाठी नवंवर्षाच्या सुरुवातीला एक गुड न्यूज राज्य सरकाराने दिली आहे. 500 स्क्वेअर फुटापर्यंत घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नगरविकास खात्याच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं मुंबईकरांनी स्वागत केलं आहे. आधीच कोरोनाने नागरीकांची आर्थिक घडी विस्कळीत झाली होती त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. 
Comments
Add Comment