Friday, June 20, 2025

'वैष्णवदेवी यात्रा' चेंगराचेंगरी दुर्घटनेप्रकरणी 13 जणांचा मृत्यू

'वैष्णवदेवी यात्रा' चेंगराचेंगरी दुर्घटनेप्रकरणी 13 जणांचा मृत्यू
जम्मू कश्मिर : जम्मूच्या कटरा (Jammu Katara)मधील वैष्णो देवी मंदिर परिसरात रात्री 2 वाजताच्या सुमाराम चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. नवीन वर्षाच्या निमित्तानं इथं दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती. या घटनेनंतर आता जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी चौकशी समिती गठित केली आहे.

या दुर्घटनेनंतर प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत. कोरोना काळात एवढी गर्दी कशी झाली? गर्दी झाली तर सुरक्षेची व्यवस्था का नव्हती? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत. आता घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. सोबतच घटनेतील मृतांच्या परिवारांना पंतप्रधान मदत निधि आणि राज्य सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
Comments
Add Comment