कणकणवली: संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी होणार. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप, हे महाविकास आघाडीला धक्का द्यायला सज्ज झाले आहेत.
गुरुवारी झालेल्या निवडणुकीत एकूण ९८१ पैकी तब्बल ९६८ मतदारांनी म्हणजे ९८.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ११५ महिला व ८५३ पुरुषांचा समावेश होता. कणकवली वगळता कुठेही गालबोट लागलं नाही. शांततेत मतदान प्रकिया पार पडली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह एकूण १४ विद्यमान संचालक निवडणूक रिंगणात उभे आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी, काँग्रेस या महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल विरुद्ध भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनेल यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मतदारांचा कौल कुणाला? याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
आज, शुक्रवारी ओरोस येथे सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणी ओरोस येथे शिक्षक पतपेढी सभागृहात मतमोजणी होणार आहे.