Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

बायोमेट्रिक हजेरीला कामगार संघटनेचा विरोध

बायोमेट्रिक हजेरीला कामगार संघटनेचा विरोध
मुंबई  : कोरोनामुळे बंद करण्यात आलेली मुंबई महापालिकेतील बायोमेट्रिक हजेरी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मात्र कामगार संघटनेने बायोमेट्रिक हजेरीला विरोध केला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिकेने बायोमेट्रिक बंद करून जुन्याच पद्धतीने हजेरी सुरू केली होती. मात्र आता नवीन वर्षात बंद केलेली बायोमेट्रिक पालिका सुरू करण्याचा विचार करत आहे. सगळ्याच कामगार संघटनेने मात्र याला विरोध केला आहे. सध्याची वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉच्या भीतीमुळे बायोमेट्रिक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी म्युनिसिपल कामगार संघटनेनेही केली आहे.

अनेक कर्मचारी, अभियंते, अधिकारी कोविड सेंटर, विमानतळ अशा ठिकाणी काम करता आहेत. अशात त्यांना आधीच मानसिक ताण असल्यामुळे बायोमेट्रिक पुढे ढकलण्यात यावे आणि ओमायक्रॉनचे वातावरण स्थिर झाल्यानंतर पुन्हा सुरू करावे अशी मागणी संघटनेची आहे.
Comments
Add Comment