
मुंबई : MPSC च्या कार्यशैलीबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्या उमेदवारांना काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात येईल असा इशारा आयोगाकडून देण्यात आला आहे. आयोगाच्या या भूमिकेवरुन अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही आयोगाला आवाहन केलं आहे की , एमपीएससी ने हे पत्र मागे घ्यावे,
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, "मुलांनी भाषा योग्य वापरावी, यात शंकाच नाही, पण #MPSC नेही अचानक परीक्षा रद्द करणं, निकाल वेळेत न लावणं, मुलांच्या शंकांचं वेळीच निरसन न करणं, हे टाळावं... तसंच भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घेऊन हे पत्र मागं घ्यावं, ही विद्यार्थ्यांच्यावतीने विनंती!"
https://twitter.com/RRPSpeaks/status/1476589891660095488