Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीकपड्यांवरील जीएसटी दरवाढीला स्थगिती

कपड्यांवरील जीएसटी दरवाढीला स्थगिती

चप्पल-जोड्याच्या किमती वाढणार

नवी दिल्ली  : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ४६ व्या जीएसटी परिषद बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी परिषदेच्या १७ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत कपड्यांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय या बैठकीत स्थगित केला आहे. यामुळे फेब्रुवारी २०२२ पर्यंत कपड्यांवरील ५ ते १२ टक्क्यांची जीएसटी दरवाढ पुढे ढकलली आहे. मात्र, दुसरीकडे चप्पल आणि बुटांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वर्षात चप्पल आणि बुटांच्या किमती वाढणार आहेत.

जीएसटी परिषदेच्या बैठकीत तामिळनाडू, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांनी कपडे आणि चप्पल बुटांवर जीएसटी वाढीच्या निर्णयाला विरोध केला. यामुळे अखेर केंद्रीय अर्थमंत्र्यांना कपड्यांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय फेब्रुवारी २०२२ पर्यंत स्थगित करावा लागला. असे असले तरी चप्पल आणि बुटांवरील जीएसटी दरवाढ अद्याप कायम आहे. त्यामुळे याचा परिणाम नव्या वर्षात चप्पल बुटांच्या किमतीवर पाहायला मिळणार आहे. सद्यस्थितीत देशात मानवनिर्मित फायबरवर १८ टक्के जीएसटी दर आहे. एमएमएफ यार्नवर १२ टक्के आणि कपड्यांवर ५ टक्के जीएसटी दर आहे.

मात्र, सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या मागील जीएसटी बैठकीत कपडे आणि चप्पल बुटांच्या जीएसटी दराच्या रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला होता. जीएसटी परिषदेच्या बैठकीत १ जानेवारी २०२२ पासून सर्व फुटवेअरवर १२ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दर सर्व किमतीच्या वस्तूंसाठी सारखाच असेल. त्यामुळे तुमची चप्पल अथवा बूट १०० रुपयांचे असो की एक हजार रुपयांचे त्या सर्वांवर १२ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. चप्पल बुटांचा जीएसटी दर कमी करण्यावर पुढील बैठकीत निर्णय होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -