ठाणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज (१ जानेवारी)रोजी दु. १२.३० वा. शेतकऱ्यांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डीडी किसान, डीडी नॅशनल राष्ट्रीय दूरदर्शनवर केले जाणार आहे. तसेच pmindiawebcast.nic.in वेबकास्टवर या कार्यक्रमाचे थेट देखील उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमात शेतकरी उत्पादक संस्थांना समभाग निधी वितरण करणे, योजनेतील लाभार्थ्यांना १० व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
तसेच पंतप्रधान मोदी हे यावेळी शेतकऱ्यांनी संवाद देखील साधणार आहेत. या कार्यक्रमास जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.