
हा विजय नितेश राणे, निलेश राणे, राजन तेली यासगळ्यांनी साथ दिली म्हणून झाला. तसंच जनता, जिल्हा आणि आमच्या देव देवतांनी दिली साथ दिली म्हणून हा विजय झाला. सिंधुदुर्गचा हा विजय म्हणजे आमचा देवदेवतांचा विजय आहे.
तसंच हा विजय मिळवताना अकलेचा वापर झाला म्हणून जिंकलो, याला अक्कल म्हणतात असा टोला यावेळी नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला....
यावेळी नारायण राणे विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राणे म्हणाले की, सगळ्यांना पुरून उरलो आणि केंद्रापर्यंत पोहचलो. आतापर्यंत थांबलो नाहीय.
राज्य सरकारवर टीका करताना राणे म्हणाले की, यांची लायकी फक्त पोस्टर लावण्याची.
महाराष्ट्राला सध्या मुख्यमंत्री नाही. राज्याची वाटचाल अधोगतीकडे चालली आहे. ३६ मतं मिळत नाहीत आणि विधानसभेची भाषा करतात. राज्यात भाजपची सत्ता हवीय, 'लगान'ची टीम नको असा अशा शब्दात नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे.