मुंबई : आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिले आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी शेवटची तारीख आज म्हणजेच, 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबरनंतर आयकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे.
आयकर विवरणपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या आठवड्यात लाखो लोकांनी विवरणपत्र दाखल केले असल्याची माहिती आयकर विभागाने अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार, 30 डिसेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत 24.39 लाख आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी 29 डिसेंबर 2021 रोजी 23,24,253 आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले होते. 28 डिसेंबर 2021 रोजी 18,89,057 आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले आहे. याआधी 27 डिसेंबर रोजी 15.49 लाख आयकर विवरणपत्र दाखल झाले होते. तसेच आतापर्यंत एकूण 5.34 कोटी आयकर विवरणपत्र दाखल करण्यात आले आहेत.
More than 5.34 crore Income Tax Returns for AY 2021-22 filed till 8pm today.
This includes 24.39 lakh #ITRs filed today itself with 2.79 lakh #ITRs filed in the last one hour.
Hope you have filed yours too!
If not, please file by the due date ie 31st December, 2021.— Income Tax India (@IncomeTaxIndia) December 30, 2021