कोलकाता : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. २८ डिसेंबरला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अद्यापही पूर्णपणे सुधारलेली नाही. परंतु, घरीच उपचार केले जाणार आहेत. कोरोनाची हलकी लक्षणे दिसत असल्यामुळेच त्याला डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला गेला.
गांगुली यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराचा झटका आल्याने वर्षाच्या सुरुवातीला त्यांना काही दिवसांसाठी रुग्णालयात दाखल केले गेले होते. कोरोनामुळे तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केल्यानंतर गांगुलीच्या प्रकृतीवर डॉक्टर सातत्याने लक्ष ठेऊन होते. त्याला आता घरीच विलगीकरणात रहावे लागणार आहे.